स्थळ: आर मॉल टर्फ ग्राउंड मुलुंड (पश्चिम) – ४०००८०.
वेळ: सकाळी ७:०० ते दुपारी १:३०
मुलुंड: शेरॉन इंग्लिश हायस्कूल मध्ये दिनांक: ७/७/२०१७ – सहावी ते दहावी , १४/७/२०१७ – तिसरी ते पाचवी, ३१/७/२०१७ – पहिली, दुसरी रोजी फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शक हर्षद सर, लाड सर हे उपस्थित होते.
मुलीहि मागील वर्षी पासून ह्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इयत्ता ६ वी ते १० वी ची सर्व मुले व मुली यांचा यात समावेश होता. सकाळी ७:०० ते दुपारी १:३० पर्यंत स्पर्धा चालू होत्या. मार्गदर्शक ‘लाड सर’ हे आपल्या विद्यालयाचे ‘माजी विद्यार्थी’ आहेत. १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची कल्पना त्यांनीच मांडली आणि विद्यार्थ्यांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला.
अँनी मॅडमनी दिलेल्या पाठिंब्यामुळे “फुटबॉल खेळूया” हि सरकारची संकल्पना प्रत्यक्षात आली. शाळेला मैदान नसतानाही मुलांनी केलेली प्रगती खूप उत्तम आहे. हे सर्व प्रत्यक्ष्यात येण्यासाठी मॅनेजमेंट, शाळा शिक्षक, विद्यार्थी वं फुटबॉल कोच या सर्वांची साथ होती.
हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी MSSA ‘मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोशिएशन’ आणि D.S.O., Reliance अशा वेगवेगळ्या मॅचेस मध्ये चांगली कामगिरी दाखविली. ‘Frameito Pro Interschool Sports Championship’ हि स्पर्धा इयत्ता ४ थी वं ८ वी चे विद्यार्थी खेळले. हायस्कूलच्या विद्यार्थीनी व विद्यार्थी U14 यांनी सुवर्ण पदक मिळवले. २०१७ – १८ या वर्षामध्ये फक्त पहिल्या सत्रामध्येच १३ मॅचेस झाल्या आहेत वं त्यातील सरासरी ‘७’ जिंकल्या आहेत. ‘दोन’ स्पर्धा बरोबरीच्या झाल्या होत्या.
फुटबॉल मार्गदर्शक हर्षद सर, प्रीतम सर, जॉन सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी चांगले तयार होत आहेत वं सर्वात महत्वाचे म्हणजे मॅडमनी दिलेल्या परवानगीमुळे आपल्याकडे उत्तम क्रीडापटू तयार होत आहेत. त्यामुळे मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानते.