मी पर्यावरण बोलतोय!

उन्हाळ्याचे दिवस होते आणि अचानक लाईट गेली. प्रचंड गरम होत होते.खिडकीत बसून हवेची वाट बघत होते. पण हवेचा काही पत्ताच नव्हता. घामाने हैराण झाले होते. एवढ्यात मोठ्याने हसण्याचा आवाज आला आजूबाजूला बघितले कोणीही नव्हते. परत आवाज आला मी विचारले, “कोण आहे? “तेव्हा प्रत्युत्तर आले “मी पर्यावरण बोलतोय!” मी त्याला विचारले, “तू का हसतोस?” त्यांनी उत्तर दिले, “तू जी माझी स्थिती केली आहे त्याचा त्रास तुला होतोय”” तो कसं काय?” असे मी त्याला विचारले व त्याने मला त्याची कहाणी सांगायला सुरुवात केली.

मी पर्यावरण बोलतोय! अरे, तुला माहीत नसेल पण मी पूर्वी खूप सुंदर, स्वच्छ होतो अगदी दृष्ट लागावी ना तसे. हिरवीगार झाडे स्वच्छ, नद्या शुद्ध, हवा यामुळे मीच काय पण पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जीव आनंदी व सुखी होता. ज्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे मी आनंदी होतो. ते सुमधुर संगीत कानावर पडल्यावर दिवस आनंदात जात होते.

पण, हळूहळू हे बदलायला सुरुवात झाली. बोलताना चांगल्या गोष्टींना लवकर नजर लागते. अगदी त्याप्रमाणे विज्ञानाची हळूहळू प्रगती झाली. मानवाची प्रगती झाली. परंतु, माझ्या मात्र अधोगतीला सुरुवात झाली. या स्वार्थी मनुष्याला माहिती आहे की, मी त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. हे तो विसरूनच गेला आहे. आता मी तुला अजून सांगतो की तू मला कशाप्रकारे त्रास देतो?

बघ हवेच्या प्रदूषणामुळे किती त्रास होतोय? कारखान्यांची निर्मिती झाली. लोकांना रोजगार मिळाले देशाची प्रगती झाली. परंतु, माझं काय कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे माझी हवा प्रदूषित झाली. माझी झाड हवेला शुद्ध करतात. ती झाड तू कापण्यास सुरुवात केली. कारण, काय तर तुला राहायला घरी हवीत? मोठ्या बिल्डिंग उभारून त्तू तुझी सोय बघितली माझी नाही.

नद्या ज्या माझ्या मुलीसारख्या. त्यांच्या बागडण्यात स्वैर पाळण्यात मला आनंद मिळत होता. जशी मुलगी पायातलं पैंजणांनी घरात आनंद पसरवते. त्याचप्रमाणे माझ्या या लेकीही सगळ्यांना आनंद देत होत्या. ते ही तुम्हाला बघवले गेले नाही. तिला दूषित करून टाकले. कारखान्यातील दूषित पाणी, घरातील कचरा, गटारातील पाणी तिच्यात सोडून दिले व तिच्या हसण्या बागडण्यावर बाधा आली. दुर्गंध घेऊन ती आज वाहते आहे .तिला तुम्ही नाराज केलं, कुरूप केलं. माझी लेक आज किती दुःखी आहे? त्यामुळे मीही दुःखी आहे. तुमच्या मुलाबाळांना असं कोणी दुखी केलं तर चालेल का? नाही ना! तसेच माझ्या मुलाबाळांनाही कोणी दुःख केलेलं मलाही चालणार नाही?

पक्ष्यांची किलबिलाट नद्यांचे खळखळणे, वाऱ्याची सळसळ हे सर्व आवाज मला आवडतात. पण, आजकाल या आवाजांच्या ऐवजी गाड्यांचा, मशीनचा, भोग्यान कान कर्कश आवाज. तो माझे कान दुखतो! पूर्वीच्या आवाजाने माझे मन प्रसन्न होत होते. तर, आज कालच्या तुमच्या आवाजाने मला त्रास होतोय. रस्त्यात रहदारी आहे. पाठीमागचा गाडीवाला हॉर्न वाजवतो हॉर्न वाजवल्यावर तो गाडीवाला काय उडून जाणार आहे का! एवढे ही आजकाल तुम्हाला समजत नाही आणि या आवाजाचा त्रास तुमच्या घरामध्ये राहणाऱ्या वृद्धांना व लहान मुलांनाही होतो आहे .तर तुम्ही तरी त्यांची कदर करा !

अरे, मनुष्य इतका पण स्वार्थी होऊ नकोस? की या स्वार्थापुढे काय चांगले? आणि काय वाईट? तुला हे समजून नाही. म्हणून, मी पण आजकाल तुझा आदर्श घेतला आहे .महापूर ,गर्मी वाढविणे, दुष्काळ असे प्रकोप करून माझा राग दाखवण्याचा मी प्रयत्न करते आहे. तरीही, तुला ते कसे कळत नाही? जशास तसे, असे मी वागणार आहे.

सुधार स्वतःला सुधार! विद्यार्थ्यांना हाताशी घे कारण, ते उद्याचे शिल्पकार आहेत. भविष्य आहे. वेगवेगळ्या उपाययोजना राबव. शाळेमध्ये शिक्षण गरजेचे आहे. पण, त्याचबरोबर माझेही महत्व माझ्या सानिध्यात नेऊन त्यांना शिकव. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हे बोलून घोषणा देऊन होणार नाही. तर, त्यांच्या कार्यातून ते त्यांनाकडून करून घे. पथनाट्य, प्रभात फेरी, नाटक इत्यादी अनेक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या मदतीने मला वाचवण्याचा प्रयत्न कर !

सरकार व काही खाजगी संस्था मला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना मदत कर! नवतरुणांना प्राधान्य द्दे! या उपक्रमांमध्ये त्यांना थोडे मानधन द्या. यामुळे दुहेरी फायदा होईल माझी परिस्थिती सुधारेल व दुसरे म्हणजे नवतरुणांनाही रोजगार मिळेल. देशातील बेरोजगारी कमी होईल. तरुणाईच्या सळसळत्या रक्तामुळे हे कामही पटकन होईल. तरुणही वाईट मार्गावर जाण्याच्या ऐवजी तो सुधारेल.

‘माझे रक्षण होईल देशाचे रक्षण होईल ‘एका दगडात दोन पक्षी’ त्यामुळे माझी तुला हात जोडून विनंती आहे माझेही रक्षण कर आणि तुझेही संरक्षण कर!

एवढ्यात आवाज आला. फॅन जोराने फिरायला लागला. मीही माझ्या स्वप्नातून बाहेर आले. माझे डोळे उघडले. आजपासून मी पर्यावरणाची काळजी करणार. हे वचन स्वतःला दिले व दुसऱ्यांना घ्यायला लावणार!

स्वच्छ सुंदर पर्यावरण आपली आहे गरज,
चला तर मग बनवू त्याला सुंदर सुंदर!

2 Thoughts to “मी पर्यावरण बोलतोय !”

  1. अमोल

    अतिशय सोप्या भाषेत विचार करायला लावणारे सुंदर लिखाण.

  2. Kavita

    Nice ..very creative thoughts yet it’s very true.

Leave a Comment