फुटबॉल स्पर्धा आढावा २०१८ – २०१९

SECONDARY
स्थळ:- नलिनीबाई दोडे विद्यालय टर्फ ग्राउंड
दिनांक:- २४/०६/२०१७ रविवार
वेळ:- सकाळी ११:०० ते ४:०० दुपारी
शिक्षक:- स्नेहा लाखकार आणि हर्षद तुळसकर
Inter House Football Match (secondary)

Football Tournament Sharon School

      दरवर्षी प्रमाणे जून मध्ये शाळा सुरु झाल्या. लगेचच दुसऱ्या आठवडयात फूटबॉल मॅचेस ठेवल्या. रविवार २४/०६/२०१८ सकाळी ११:०० ते ४:०० दुपारी इतका वेळ मॅचेस घेण्यात आल्या. पाऊस खूप जोरात होता. एकूण ९२ विद्यार्थ्यांनी नावे नोंदविली. हर्षद सरांनी पण जोरदार पावसात उभे राहून विद्यार्थ्यांच्या एकूण १९ स्पर्धा घेतल्या. सरांचे निर्णय विद्यार्थ्यांना मान्य होते. सर्वं स्पर्धा अगदी व्यवस्थित पार पडल्या. वेळेत  सुरु होऊन वेळेत संपविण्यात आल्या. ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांची नवे D S O   व M S S A अशा मोट्या स्पर्धांना पाठवायची असतात म्हणूनच ह्या स्पर्धांची आखणी लवकर करण्यात आली होती.

      १ ली ते ५ वी च्या स्पर्धा जुलै महिन्यात घेण्यात आल्या.

      मोठ्या विद्याथ्यांचे स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे.

Football Matches Table

Football Match Sharon School

ज्या विद्यार्थ्यांनी काही उत्कृष्ट कामगिरी केली त्यांना बक्षिसे देण्यात आली. अशा विद्यार्थ्यांची नांवे

Football Matches Table 2

Football Match at Nalinibai Dode Vidhyalay

 
PRIMARY
Ist to Vth
फुटबॉल स्पर्धा आढावा
स्थळ:- नलिनीबाई दोडे विद्यालय टर्फ ग्राउंड
दिनांक:- २१/०७/२०१८ शनिवार
वेळ:- सकाळी १०:०० ते २:०० दुपारी

      २१ जुलै रोजी १ ली ते ५ वीं  इयत्तेसाठी फूटबॉल मॅचेस नलिनीबाई दोडे विद्यालय टर्फ ग्राउंड मध्ये १०:०० ते २:०० वाजे पर्यंत ठेवण्यात आल्या होत्या. त्यात १३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व स्पर्धांची आखणी स्नेहा टिचर यांच्या मार्गदर्शन खाली झाली. शाळेचे फुटबॉल प्रशिक्षक हर्षद तुळसकर सर यांच्या सहकार्याने पार पडल्या. हर्षद सरांना शाळेचे २ विद्यार्थी आयुष कंक व जय माणेक यांनी सहकार्य केले. शाळेच्या प्रिंसिपल अँनी थॉमस मॅडम यांच्या प्रोत्साहनातून ह्या स्पर्धा साकारण्यात आल्या.

 

 

      विद्यार्थी आणि पालक वर्ग सर्व जणांना स्पर्धा खूप आवडल्या आणि सर्वजण आनंदित होऊन घरी परतले. पालकांनी आणि स्नेहा टिचरने खूप फोटो  काढले. स्पर्धा वेळेत सुरु झाल्या आणि वेळेत संपल्या. उपस्थित विद्यार्थ्यांना एक एक ५ स्टार चॉकलेट देण्यात आले. प्रायमरीच्या मुलांच्या पण फुटबॉल स्पर्धाचे घेण्याचे हे दुसरे वर्ष आहे.

      स्पर्धा घेण्याचा हेतू एकच आहे की  मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण होणे आणि व्यायामाचे महत्व पटविणे. मोकळ्या हवेत खेळण्यामुळे आनंद, उत्साह वाढतो, व्यायाम होतो व शरीर सुदृढ रहाते.

Contributed by Sneha Lakkar, P.T. Teacher
 

One Thought to “फुटबॉल स्पर्धा आढावा २०१८ – २०१९”

  1. Sapna Sharma

    Superb !!!Supriya . Great job. Nice play way method to teach Hindi Grammar. It’s looking interesting and fun oriented. Students can get internet to learn Hindi Grammer.
    Keep it up…..

Leave a Comment